8042753729
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
Weight loss in Marathi - स्थौल्य (Obesity) हा विकार मानवास वाढत्या औद्योगीकरणाची, वाहणांची व सुखसोयींची देण आहे. स्थौल्याचे कारण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असु शकते त्यामुळे व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, देश, काल, ऋतु व इतर शरीर क्रियात्मक बाबींनुसार उपचार देखिल बदलतात. त्यामुळे एका व्यक्तीला स्थौल्यावर उपयुक्त ठरलेली औषधी दुसर्यावर तेवढीच प्रभावी ठरेल असे नाही. म्हणुनच आयुर्वेदानुसार वजन कमी करण्यासाठी Personalized approach ची गरज असते. वजन कमी करण्याची त्रिसुत्री म्हणजे- आहार-विहार, व्यायाम व औषधी. आपण स्थुल आहात काय? स्थौल्य ठरवण्यासाठी एक सोपी टेस्ट आहे, ती म्हणजे Body Mass Index (BMI) BMI म्हणजे शरीराचे वजन उंचीच्या प्रमाणात कि ती आहे हे सांगणारा सुचक अंक. शरीराचे वजन व उंचीचा वर्ग यांचा भागाकार केल्यास BMI मिळतो. BMI= (वजन (कि.ग्रॅ.मधे))/[उंची(मीटर मधे) ]^2 साधारणत: योग्य BMI हा १८ ते २३ इतका असतो ओव्हर वेट = २३ ते २८ BMI , अशी व्यक्ती स्थुल नसते पण स्थौल्याकडे सरकत असते स्थौल्य = २८ च्या पुढे BMI असलेली व्यक्ती स्थुलतेच्या कक्षेत येते. Weight loss Treatment in Marathi - आयुर्वेदानुसार स्थौल्याची चिकित्सा करताना अपतर्पन, लंघन, रुक्षण चिकीत्सा करावी लागते. बस्ती, वमन इ.पंचकर्माद्वारे शरीराचे शोधन करुन प्रथम शरीराचे चयापचय (Metabolism) योग्य करणे गरजेचे असते. यानंतर कफमेदोहर व लेखन औषधी ज्यामुळे मेदाचे पाचन व क्षरण होइल अशा गुग्गुळ कल्प, शीलाजीत, लोहकल्प, गोमुत्र, त्रिकटु यांसारख्या औषधींचा वापर व्यक्तीनुसार कमी अधिक केला जातो. जाठराग्नी सोबत मेदोधात्वग्नीची देखिल चिकीत्सा केल्याने अस्थी- मज्जा- शुक्र धातुंचे देखिल योग्य पोषण सुरु होते. Weight loss diet in Marathi - आहाराचे पथ्य- - रोज व्यक्ती २७०० कॅलरीज चा आहार घेतो तो १/३ इतका (९०० कॅलरी) कमी करावा. - त्यासाठी साखर, बटाते, भात, फॅट्स व कार्बोहायड्रेट युक्त आहार कमी करावा. - दिवसा झोपणे टाळावे, अवेळी जेवणे व घाइने जेवने ताळावे - डालड तुप, गोड व तळलेले पदार्थ, थंड पदार्थ, आइस्क्रीम, म्हशीचे दुध व दुधाचे पदार्थ टाळावेत. for treatment visit clinic. you can alos book appointment on - www.ayushmanbhavayurveda.com