8042753729
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
पाठदुखीने ग्रस्त आहात मग हे जाणुन घ्या बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन व अरोग्याविषयी निष्काळजीपणा या सर्व कारणांमुळे हल्ली काही आजार चांगलेच बळावत आहे. पाठदुखी देखिल हल्ली ३० ते ६० वयोगटात अढळणारी सामान्य आरोग्य समस्या आहे. असे म्हटले जाते की साधारणत: ४० ते ४५ % लोक जीवनात पाठदुखीच्या आजाराने कधी ना कधी ग्रस्त होतातच. त्यातील बरेचसे आपोआप व आराम केल्याने बरे होतात तर उरलेले लोक जुनाट पाठीच्या किंवा मनक्याच्या विकाराने ग्रासले जातात. साधारणत: ६ आठवडे जर पाठदुखी बरी झाली नाही तर ती जुनाट पाठदुखीचे स्वरुप घेते व योग्य चिकित्से शिवाय ती बरी होत नाही. पाठ दुखीचे किंवा कंबर दुखीचे अनेक कारणे आहेत. प्राथमिक कारणे म्हनजेच पाठीच्या मनक्याच्या व तेथिल स्नायु, लिगामेंट यांच्याशी निगडीत आजार व द्वितियक कारणे म्हणजेच पोटाशी किंवा इतर भागातील वेदना स्थलांतरीत (referred) होऊन पाठीत वेदना जानवने. आयुर्वेदामधे याचे कटीग्रह किंवा कटीशुल म्हणुन वर्णन अढळते येथे कटीचा अर्थ पाठ व ग्रह म्हणजे संकुचीत होणे किंवा वेदना. अतिप्रमानात वजनदार वस्तु उचलणे, अति वाहण प्रवास, मार लागणे, बसण्याच्या चुकिच्या पद्धती तसेच चुकिचा वातवर्धक आहार ही सर्व यास कारणीभुत असतात. तसेच आमवात, संधीवात, गृध्रसी(Sciatica), मनक्यांतील गादी सरकणे, मनक्याच्या हाडांची झीज ही देखिल पाठदुखिची प्रमुख कारणे आहे. स्त्रीयांमधे पाठदुखी किंवा कंबर दुखीचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत अधिक असते. स्त्रीयांचा दुय्यम दर्जाचा आहार, व्यायामाचा अभाव, प्रेग्नंसी या कारणांमुळे त्या आमवात, संधीवात, स्पॉंडीलायटीस, डिस्क प्रॉलॅप्स या आजारांनी लवकर ग्रस्त होतात. पाठदुखीची कारणे- खालील आजार/ अवस्था या पाठदुखीसाठी प्रामुख्याने कारणीभुत असतात. १.सर्वात सामान्य कारण - स्नायू किंवा लीगामेंट ताण व इजा - २.लंबर डिस्क हर्निएशन - मनक्यांतील गादी बाहेर येणे ३. डिस्क प्रोलॅप्स / स्लिपडिस्क - मनक्यांतील गादी सरकने यात मुख्यतः नितंब आणि पाय (कटिस्नायुशूल) या ठीकाणी वेदना होतात ४. स्पाइनल जॉइंट संधीवात - सामान्यत: हळू हळू वेदना होतात आणि रोगाचा विकास होताना जांघांमध्ये संदर्भित (referred pain) वेदना होतात ५.स्पाइनल कॅनल स्टेनोसिस आणि ६.स्पान्डिलोलिस्थेसिस- पाठीच्या मनक्यामधील स्पायरनल कॉर्ड (मजारज्जु) पोकळीची जागा कमी/ संकुचीत होणे व वात नाड्यांवर दबाव येऊन सायटिका आणि पाठीच्या वेदना सुरु होणे ज्या सामान्यत: चालताना वाढतात. ७.स्पाइनल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर - विशेषतः पोस्टमेनोपॉज महिला, ऑस्टियोपोरोटिक(ठिसुळ हाडे) व्यक्ती आणि दीर्घकालीन स्टेरॉइडचा वापर(विशेषत: दम्यामध्ये) अशा व्यक्तींमधे दुर्बल हाडांच्या संरचनेमुळे कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होणे सामान्य असते. आयुर्वेदानुसार पाठदुखीसाठी वातदोष हाच प्रामुख्याने कारणीभुत असतो व हा वातदोष पाठीच्या स्नायु व मनक्यांमधे वाढण्याची कारणे खालील प्रमाणे. पाठदुखी टाळण्यासाठी खालील आहार विहार टाळावा- - खुर्चीवर बसुन किंवा संगनकावर जास्त काम असेल तेव्हा पाठीचा मनका ताठ राहील असेच बसावे. - जास्त वाकुन अभ्यास करने, खडबडीत रस्त्यांवरुन अती प्रवास करणे टाळावे - अती थंड पेय पदार्थ, पचन्यास जड व ज्यामुळे अपचन होइल असा आहार टाळावा. - नियमीत उष्ण पाणी पिल्यास अधिक फायदा दिसुन येतो. - दिवसा झोपणे पुर्णत: टाळावे तसेच रात्री जागरण देखील करु नये व पुरेशी झोप घ्यावी. - चना दाल व दाळीचे पदार्थ आहरातुन शक्य तेवढे कमी करावेत. - तळलेले, तुपकट व जास्त मसालेदार पदार्थ टाळावेत. - थंड पाण्याने स्नान करणे टाळावे तसेच जेवल्यानंतर लगेच स्नान करु नये जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमधे कटीग्रह म्हणुन उल्लेखित हा आजार आयुर्वेदिक औषधी व पंचकर्माने सहज कमी केला जाऊ शकतो. बहुतेक वेळा वात दोष आणि इतर दोषांमुळे याची सुरुवात होते व त्यामुळे प्रामुख्याने वात दोषाची चिकित्सा करने गरजेचे असते. ज्यात वात नाशक औषधींचा उपयोग पोटातुन व बाह्य भागात तेलांच्या स्वरुपात केला जातो. पंचकर्म जसे बस्ती, कटी बस्ती, वमन, पत्रपोट्टली स्वेद इ. देखिल अतिशय उपयुक्त ठरतात. बस्ती ही वाताची अर्धी चिकित्सा म्हणुन वर्णित आहे व ती केल्याने पाठ्दुखीची लक्षणे ५० % पर्यंत कमी होतात त्यामुळे योग्य औषधांनी केलेली बस्ती पाठ्दुखीसाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. गुडुची, रास्ना, शल्लकी, गुगुलू, निर्गुंडी तसेच अभ्रक भस्म सारखी वेगवेगळी भस्म औषधी इत्यादी औषधे देखील कटीग्रहामधे प्रभावी आहेत व ती प्रकृती, वय, आजाराची स्थिती यांचा विचार करुन वेगवेगळ्या स्वरुपात व मात्रेत वापरली जातात. डॉ.योगेश शिवाजी चव्हाण(नाशिक) एम.डी.(आयु.)केरळ Mob.-९४०५६१३६१८ https://www.ayushmanbhavayurveda.com https://www.ayurvedanashik.com